School rules, guidelines, and important notices for students, parents, and staff.
या माध्यमिक शाळेतील विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी शाळेची नियमावली
१) विद्यार्थी/विद्यार्थीनीने दररोज शाळेत वेळेवर व शाळेच्या स्वच्छ गणेवेशात आले पाहीजे.
२) विद्यार्थी / विद्यार्थीनीने स्वतः टापटिपेत राहीले पाहीजे आणि वर्ग व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवला
पाहीजे.
३) कार्यानुभव व विषयासाठी शिक्षकांनी दिलेली कामे दिलेल्या आदेशाप्रमाणे केली पाहीजे.
४) वर्गातील बाके व भिंती स्वच्छ ठेवाव्यात मोडतोड करु नये. केल्यास नुकसान भरपाई द्यावी लागेल.
५) विद्यालयीन फी वेळच्या वेळी भरावी.
६) शिक्षकांनी दिलेला अभ्यास दररोज व वेळच्या वेळी केला पाहीजे.
७) जादा तासास विद्यार्थी/विद्यार्थीनीने हजर राहिले पाहीजे.
८) विद्यार्थी / विद्यार्थीनीने विद्यालयाच्या शिस्त विषयक नियमास अनुसरुन वेळोवेळी जे शिस्तीचे
नियम करील ते त्यांनी काटेकोर पाळले पाहीजेत.
९) पालकांनी आपल्या पाल्याची शाळेतील दैनंदिन उपस्थिती व अभ्यासा बाबत व स्वच्छते बाबत जागरुक राहुन
वेळच्या वेळी शाळेच्या संपर्कात राहीले पाहीजे.
१०) पालक शिक्षक संघाच्या सह विचार सभेत पालकांची उपस्थिती आवश्यक आहे.
११) काही कामा निमित्त विद्यार्थी शाळेत गैरहजर राहीला असेल तर शाळेत आपण समक्ष येऊन वर्ग शिक्षकांस
त्या संबंधी भेटले पाहीजे चिठ्ठी दिली पाहीजे.
१२) या प्रवेश अर्जा सोबत जोडलेल्या शाळा सोडल्याचा दाखल्यावर आपल्या पाल्याचे नाव, जन्मतारीख, जात
आणि इतर नोंदी बरोबर असल्याची खात्री करुन घ्यावी व जर काही चूक असेल तर मा. मुख्याध्यापकांच्या
नजरेत त्वरीत लेखी स्वरुपात आणुन द्यावे. अन्यथा चुकीची तपशिल तसाच राहुन गेल्यास त्यास ती शाळा
जबाबदार रहाणार नाही.
शाळेची वरील सर्व नियमावली मी वाचली असुन ती मला मान्य आहे.